Corona test complete details
कोरोना टेस्ट : समज गैरसमज
सध्या आपल्याला ऐकण्यात येते, टेस्ट एका लॅब मध्ये पोसिटीव्ह आली आणि दुसरीकडे नेगेटिव्ह..! कोरोना टेस्ट नेगेटिव्ह असूनही डॉक्टर रुग्णाला कोरोना झाला असे म्हणत आहेत..! हा भ्रम कशामुळे?? त्यासाठी खालील गोष्टी समजून घ्या.
कोरोना च्या साठी मुख्यतः या टेस्ट केल्या जातात.
1. RT PCR swab
2. TruNat/CB NAAT swab
3. Antigen test
4. Antibody test (Ig M आणि Ig G)
प्रथम तीन टेस्ट सध्या कोरोना असलेल्या व्यक्तीमध्ये पोसिटीव्ह येत असतात. Ig M Antibody test antibody टेस्ट सध्या आजार असलेल्या आणि ठीक होत असलेल्या मध्ये पोसिटीव्ह येत असते. Ig G antibody ही टेस्ट आजार ठीक होऊन गेलेल्या लोकांमध्ये पोसिटीव्ह येत असते.
ह्या सर्व टेस्ट मध्ये ही काही कमतरता असतात. ह्या कोरोनाचे लक्षण असूनही सर्वच्या सर्व कोरोना रुग्णांमध्ये पोसिटीव्ह येत नसतात. रुग्णाला कोरोनाची लक्षणे असूनही टेस्ट नेगेटिव्ह असू शकते. असे का होते? बऱ्याच गोष्टीवर टेस्ट result अवलंबून असतात.
१. वेळ: आपण टेस्ट लक्षणांच्या सुरुवातीच्या 2-3 दिवसात किंवा खूप उशिरा जसे की 12-14 दिवसानंतर केली तर कोरोना आजार असूनही टेस्ट negative येऊ शकते.
२. टेस्ट चा प्रकार: RT PCR ही टेस्ट 10 कोरोना रुग्णामध्ये 7 मध्येच पोसिटीव्ह येत असते. Antigen टेस्ट ही फक्त 50% कोरोना रुग्णामध्ये पोसिटीव्ह येत असते.
३. Swab घेण्याची जागा: घश्यापेक्षा नाकातून swab घेतला तर स्वब पोसिटीव्ह येण्याचे जास्त चान्स असतात.
४. Technical प्रॉब्लेम: अशा बऱ्याच छोट्या छोट्या बाबी असतात.
Swab नेगेटिव्ह आल्यास मग निदान कसे होणार?
1. छाती चा CT स्कॅन वर बऱ्याच रुग्णामध्ये निदान करता येते (आजाराची लक्षणे नसलेल्या रुग्णामध्ये सुद्धा). पण ही तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावी.
2. रुग्णाची पूर्ण history, कोरोनाची लक्षणे आणि शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण (पल्स ऑक्सिमीटर च्या साहायाने) तपासून डॉक्टर कोरोनाचे अचूक निदान करू शकतात.
अश्या प्रकारे निदान करून (swab negative असताना सुद्धा) कोरोना चा इलाज आवश्यक असतो. Swab negative समजून, डॉक्टरांवर विश्वास न ठेवता इलाज नाही करणे रुग्णाला नुकसानदायक ठरू शकते. अशा रुग्णापासून आजार दुसर्यांना पसरू शकतो. त्यासाठी टीव्ही व इतर प्रसार माध्यमाच्या भ्रामक न्युज पासून दूर राहा. डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करा. हा आजार बऱ्याच रुग्णामध्ये लक्षण विरहित असतो, पण मधुमेही वृद्ध इत्यादी अशा लोकांना धोकादायक ठरतो.
त्यासाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवून कोरोनाच्या आजारावर विजय मिळवन्यास सहकार्य करा.
संकलन: डॉ. चंद्रकांत टरके
अपोलो हॉस्पिटल हैद्राबाद
0 comments:
Post a Comment
Any queries or doubts let us know